उजाड मोकाट वारा
क्षणभर थांबलाच नाही
सुसाट बेभान वेड्यापरी गेला
सारं सारं मोडीत गेला
बंध रेशमाचे तोडीत गेला
आठवणींच्या खपल्या जोडीत गेला
मोडीत गेला, तोडीत गेला, जोडीत गेला
थोडासा विसावा मिळालाच नाही
उजाड मोकाट वारा
क्षणभर थांबलाच नाही
नात्यांचे कण
हवेत उधळून
आनंदाचे क्षण
पायदळी तुडवून
भिंगारीसम
गरगर फिरवून
उधळून, तुडवून, फिरवून घोंघावत गेला
थोडासा दिलासा मिळालाच नाही
उजाड मोकाट वारा
क्षणभर थांबलाच नाही
सुखाचा ओलावा
वाफ होऊन उडाला
दु:खाचा धुराडा
दाटून आला
तुझा विश्वासघात
वैऱ्याची रात
आहे संगतीला
वादळ......... वारा तोही
वादळ......... वारा मीही
आता.......... कधी शमणारच नाही
आता.......... कधी थांबणारच नाही !!!
No comments:
Post a Comment