Sunday, March 18, 2012

कटुसत्यचैतन्यझरा
आटला.......विटला
मरगळ........मरण घळ?


चंचल वारा
थांबला........विरला
अवकळ.........अवनीवर!


लुकलुक तारा
विझला........मिटला
जरजर.........जर्जर!


तुच खरा
वाटला.........मला
असत्य?.........कटुसत्य?

No comments:

Post a Comment