Thursday, March 8, 2012

निशा

गत आठवणींचा स्मृती झरा वाहे मनी
गं सजनी तुझ्या शयनी प्रहरी निशा...

हे गर्भरी शर्वरी भरजरी थरथरी
तव मिठीत्त मदमस्त लहरी निशा...

फुटकळ विटकळ नशिबाला ठिगळ
अंतक्षणी मगरूर क्रूर कहरी निशा...

आकस्मित मजला प्रकाशात असूनही
तव अस्तनीत लपलेली जहरी निशा...

घातलाटांनी चूर जाहला स्वप्न पत्थर
उध्वस्त मी निद्रिस्त मी जीवनी गहरी निशा...

No comments:

Post a Comment