Monday, February 27, 2012

या माझ्या धरणीने.....

या माझ्या धरणीने
    घेतले अंगावर पिवळे ऊन
जणू सोनेरी पाण्याने
    धरणी निघाली न्हाऊन
आन्हिक उरकले तीने
    बसली नटुन थटुन
लाल गुलाबी गुलमोहराने
    भाळी कुंकू लावून
तरी पिवळ्या ऊनाने
     धरणी गेली मळून मळून
वाट पाहिली तीने
     डोळे लावून लावून
कधी त्या वरुणाने
     तहान जाईन भागून
हाक ऐकली त्याने
     पडला पिळून पिळून
रंगहीन त्या जलाने
      मळ गेला निक्षून
हास्य केले धरणीने
      हिरवा शालू नेसून
पर्ण-कळी-फुलाने
      धरणी गेली बहरुन !!!

No comments:

Post a Comment