एक हरित पातं
एक बोलकं नातं
असूनही……….
का ही भयाण शांतता?
एक भरीव सुगंध
एक गोड बंध
असूनही……….
का ही जीवघेणी कटुता?
एक सूर
एक ताल
असूनही……….
का हे बेसूर संगीत, आलाप छेडीता?
एक श्वास
एक विश्वास
असूनही……….
का ही पोकळ संदिग्धता?
तू माझी
मी तुझा
असूनही……….
का ही जवळीकतेची औपचारिकता?
एक मन
एक 'अंतर'
असूनही……….
दोघांच्या अंतरात 'अंतर' का?
BESUR SANGITANE "hruday" matra ulhasit kele..
ReplyDeletechan