Monday, March 19, 2012

.....निशब्दातशब्दांत लुप्त झाला
शब्दांचा अर्थ सारा
निशब्दात स्थिरावला
तो वादळी किनारा !


केला या पामराचा
जगाने तिटकारा
चिंधाळ भावनांचा
ओलसर धुमारा
.....निशब्दात स्थिरावला
तो वादळी किनारा !दाटू लागला मनी
काळाकुट्ट काळोरा
प्रकाश हरवला
काळसंधीत सारा

.....निशब्दात स्थिरावला
तो वादळी किनारा !


न लाभला तयाला
भावनांचा उबारा
भस्म करून गेला
तो ज्वलंत निखारा

.....निशब्दात स्थिरावला
तो वादळी किनारा !


आता शिल्लक मागे
नेत्राश्रूंचा पसारा
अनाहूत फुटला
श्वासांना हुंदकारा

.....निशब्दात स्थिरावला
तो वादळी किनारा !


रेघा रेघांत शोधे
तो स्वत:ला बिचारा
कटूकोडे रेघांचे
सुटेल का? विचारा

.....निशब्दात स्थिरावला
तो वादळी किनारा !


एक अभिवादन
मूक संगीतकारा

.....निशब्दात स्थिरावला
तो वादळी किनारा !

1 comment: