केले मी अवचित धाडस न कुणी करावे
तुजला पुसले मी पुरता वेडावलो आहे
तुझा गं होकार देऊन जाईल सुख मला
अन तुझ्या नकारातही मीच जिंकलो आहे
थोडीशी वाटलेली आशा धूसर होत गेली
उष:काल कोठे? अंधारात हरवलो आहे
काळोखाची क्षतिभीतीही आता मनात नाही
अंधारच जीवनी अन मी सरावलो आहे
अशा कित्येक मऱ्हाटी मी साहिल्या पानिपती
विश्वास हरवला आता मनी दृढावालो आहे
गं ऐक प्राणप्रिये सखे खरे सांगतो तुला
प्रेमात हरण्याची मजाच काही और आहे!!!
No comments:
Post a Comment