(प्रसिद्ध : जून २००३, लोकसत्ता-चतुरा मासिक)
----------------------------------१----------------------------------
गोष्ट वेड्या पावसाची
रिमझिम झिमझिम
टिमटिम टिंबांची
गोष्ट वेड्या पावसाची
खळखळ अवखळ
खळखळ जळाची
गोष्ट वेड्या पावसाची
आतुर आतुरता
चतुर चतुरता
चातक चोचीची
गोष्ट वेड्या पावसाची
निळी नवलाई
निळसर निळाई
निळ्या नभाची
गोष्ट वेड्या पावसाची
रिमझिप रिपरिप
सरसर टपटप
झुळझुळ खळखळ
पेरण उगवण
सुरेल गीतांची
गोष्ट वेड्या पावसाची
----------------------------------२----------------------------------
गोष्ट वेड्या पावसाची
एका छत्रीत निम्मं निम्मं भिजण्याची
गंधित तन
मस्तीत मन
तू मला
मी तुला
पाहतो असे
का?.. कसे?..
चलबिचल मनांची
गोष्ट वेड्या पावसाची
एका छत्रीत निम्मं निम्मं भिजण्याची
थरथरते हात
माझ्या हातात
धडधडते काळीज
दोघांच्या हृदयात
अडकलो दोघेही
डोळ्यांच्या खेळात
का?.. कसे?..
चलबिचल मनांची
गोष्ट वेड्या पावसाची
एका छत्रीत निम्मं निम्मं भिजण्याची
अबोल प्रीती
ढळली नीती
आपले मिलन
अटळ नियती
मी.... वेडा
तू..... वेडी
का?.. कसे?..
चलबिचल मनांची
गोष्ट वेड्या पावसाची
एका छत्रीत निम्मं निम्मं भिजण्याची