उजाड मोकाट वारा
क्षणभर थांबलाच नाही
सुसाट बेभान वेड्यापरी गेला
सारं सारं मोडीत गेला
बंध रेशमाचे तोडीत गेला
आठवणींच्या खपल्या जोडीत गेला
मोडीत गेला, तोडीत गेला, जोडीत गेला
थोडासा विसावा मिळालाच नाही
उजाड मोकाट वारा
क्षणभर थांबलाच नाही
नात्यांचे कण
हवेत उधळून
आनंदाचे क्षण
पायदळी तुडवून
भिंगारीसम
गरगर फिरवून
उधळून, तुडवून, फिरवून घोंघावत गेला
थोडासा दिलासा मिळालाच नाही
उजाड मोकाट वारा
क्षणभर थांबलाच नाही
सुखाचा ओलावा
वाफ होऊन उडाला
दु:खाचा धुराडा
दाटून आला
तुझा विश्वासघात
वैऱ्याची रात
आहे संगतीला
वादळ......... वारा तोही
वादळ......... वारा मीही
आता.......... कधी शमणारच नाही
आता.......... कधी थांबणारच नाही !!!
तू उत्तर ध्रुव तारा
स्थिर निश्चल
स्थान अढळ
.....तू मूक
.....घडणाऱ्या
.....न घडणाऱ्या
.....बिघडणाऱ्या
.....साऱ्यांचा
.....साक्षीदार
.....मूक
.....कदाचित
अनावर ..... दु:ख
वरवर ..... हसतमुख
आसवं ..... गिळून
मन ..... पिळून
ठार ..... स्थिर
.....केवळ .....लुकलुक
.....जागच्या ..... जागी
..... स्थिर ..... निश्चल !!!
मी दक्षिण ध्रुव तारा
अनभिज्ञ गुप्त
विश्वाच्या पोकळीत
कुठेतरी लुप्त
..... पडद्याआड ..... अंधाराच्या....
..... कुठेतरी ..... वर न दिसणारी....
आतल्या आत ..... लुकलुक.....
मी ..... अनाकलनीय.....
..... जगासाठी
मी ..... अनाकलनीय.....
..... तुझ्यासाठी
मी ..... अनाकलनीय.....
..... माझ्यासाठी
मी .....
.....अनाकलनीय
..... अस्तित्वहीन
..... अवघड
..... न उलगडणारं
..... कोडं !!!
आपण दोघं
विरुद्ध टोकं
एक मी
..... मुळात नसलेलाच
एक तू
..... असूनही नसलेली
दोन्ही टोकं
..... मिलनाला आसुसलेली
विधात्याच्या?
..... कदाचित स्वत:च्याच
..... कर्माने दुरावलेली
..... शक्य नाही
..... हे मिलन
जाणीव
..... हि वास्तवातली !!!
कढ
..... हि आयुष्यातली !!!