Friday, March 2, 2012

........... दाटला अंधार दृढ


शांतता शांतता
भयाण शांतता
स्मशान शांतता
निसर्ग स्तब्ध क्रुद्ध
........... दाटला अंधार दृढ

मनाच्या संधीत
काळजाच्या कुपीत
अजूनही तसेच
दडलेले गूढ
........... दाटला अंधार दृढ

दु:खाची साथ
सुख दोन हात
नेहमी असेच
दैवाचा हा सूड?
........... दाटला अंधार दृढ

शापित या नशिबी
प्रेमाची गरिबी
सवय झालीय
रुक्षता जीवनी रूढ
........... दाटला अंधार दृढ

स्थिर जीवनघाई
न उरले हाती काही
मन चल? अचल?
शांत मी दिग:मूढ
........... दाटला अंधार दृढ



 

Thursday, March 1, 2012

क्षण निरोपाचा.....


सहन नाही होत
          काळजाला चीर
मनात रुदन
          चेहरा खंबीर
नकली हास्य 
          गालावर स्थिर
आत भव्य वादळ
          वरकरणी धीर

क्षण हा असा
          येणारच होता
तुला अन मला 
          दूर करणारच होता
नेत्रात पाणी
          भरणारच होता
आयुष्य आनंदाचे
          संपवनारच होता 

हातात न कुणाच्या 
         दोघेही हतबुद्ध 
दैवाने लिहिलेले 
         ऐसे आपले प्रारब्ध 
ओलावल्या कडा 
         भिजलेले शब्द 
क्रूर निसर्ग 
         निजलेला स्तब्ध !!!